कोरपणा येथे उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त नागपूर यांनी मागवलेल्या माहितीवरून कोरपणा व जीवती तहसीलदारांनी 22 विवरणाची माहिती सादर केली आहे. भाजप पक्षांचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अशीच ताजने यांनी सतत पाठपुरावा करून अखेर या मागणीला यश आले असल्याचे मत पाच सप्टेंबर रोज सकाळी दहा वाजता दरम्यान व्यक्त केले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या अडचणी कोरपना येथेच सोडवल्या जाणार आहे.