त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने ग्रामपंचायत हद्दीतील बोरीचीवाडी येथे कोंबड्या खाण्यासाठी गेलेला बिबट्या पोल्ट्रीच्या शेडमध्ये अडकल्याची घटना घडली. याबाबत वनविभागाला माहिती मिळाल्यावर तात्काळ घटनास्थाळी धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला ताब्यात घेतले.