मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता भेट दिली. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने लढा देणारे आणि समाजाच्या आवाजाला दिशा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या भेट घेऊन आमदार सिद्धार्थ खरात यांनी सविस्तर चर्चा करून आंदोलनाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.