आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेले माहितीनुसार धनगर एसटी आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका, असं आवाहन जालन्यातील धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी धनगर समाज बांधवांना केलं आहे. आपला लढा थांबलेला नाही, आपण फक्त थोडी विश्रांती घेतो आहोत, असं बोराडे म्हणालेत. राज्यातील काही भागांत धनगर समाजातील काही बांधवांनी एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोराडे यांनी समाजातील बांधवांना आत्महत्येसारखे ट