फुलांच्या सौंदर्याने नटलेले कोल्हापूर जिल्ह्यातील उदगिरी पठार पर्यटकांना भूरळ पाडत आहे. शाहूवाडी तालुक्यातील मिनी कास पठार... सांगलीच्या चांदोली धरण आणि अभयारण्य या पर्यटन स्थळांना लागूनच असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील हे पठार शितूर, उदगिरी मार्गावरती आहे. हे पठार उंच ठिकाणी असून विस्तीर्ण आहे. जैवविविधतेने नटलेले असून या पठाराला निसर्गाने भरभरुन दान दिले आहे. या ठिकाणी दुर्मिळ फुलांच्या प्रजाती फुलण्यास सुरुवात झाली असल्याने निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी पर्यटकांची पावले या पठाराकड