29 सप्टेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार सततच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान काटोल नरखेड व इतर भागात झालेले आहे. अति पावसामुळे संत्रा मोसंबी तूर कापूस भुईमूग व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरीही सरकारकडून कोणत्याही प्रकारची ठोक मदत मिळाली नाही. दरम्यान तात्काळ पाहणी पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतमालाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीतर्फे करण्यात आली.