अरततोंडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता, इमारतीची स्थिती, तसेच विविध शैक्षणिक सुविधा व योजनांची अंमलबजावणी यांचा आढावा घेतला. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेचा ताळेबंद, विद्यार्थी संख्या, शिक्षकांची उपलब्धता, शैक्षणिक प्रगती, तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान विविध वर्गांना भेट दिली, विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना शैक्षणिक प्रश्न विचारली ज्याची विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.