जळगाव तालुक्यातील पिंप्राळा येथील मयूर कॉलनी परिसरात राहणारा हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई करत अटक केली आहे. त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्याती हद्दपार करण्यात आले होते. याप्रकरणी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.