मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २९ ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले होते,या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उदगीर तालुक्यातील अनेक मावळे मुंबईला गेले होते, मुंबई येथील आंदोलन संपल्यानंतर ते आपल्या गावी सुखरूप परतले,गावाकडे सुखरूप आलेल्या मावळ्यांचा उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ३ सप्टेंबर रोजी सांयकाळी साडे सहा वाजता सकल मराठा बांधवांनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करून मराठा बांधवांनी जोरदार घोषणा दिल्या.