मानसूनचे आगमन झाले आहे.येत्या काही दिवसात मानसूनची प्रगती आणखी होणार आहे. त्यामुळे मानसून पूर्व नाला सफाईची कामे तातडीने आठवडाभरात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सर्व नगर परिषद व नगर पंचायतच्या मुख्याधिका-यांना दिले आहे.