मंत्री शिवेंद्रराजेंचे शिवतीर्थ येथे जंगी स्वागत मराठा आरक्षणामध्ये महत्वाची भूमिका सरकारच्यावतीने राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे यांनी बजावल्याने त्यांचे स्वागत साताऱ्यात शिवतीर्थ येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता जंगी असे करण्यात आले. फटाके फोडून, हलगीच्या तालावर, तुतारीच्या निनादात एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.