आठ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार बेला पोलिस सिर्सी बस स्टॉप समोर नाकाबंदी करत असताना त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आयशर ट्रकला थांबविले असता आरोपी आयशर ट्रक सोडून पळून गेला. पोलिसांनी त्याची पाहणी केली असता त्यामध्ये 22 गोवंशजनावर आढळून आले. आरोपी गोवंशाची अवैध वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आयशर ट्रक व 22 गोवंश जनावरे असा एकूण पाच लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू केला आहे.