मुंबई शहर आणि उपनगर महानुभावपंथीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा ८०३वा अवतार दिन ऐतिहासिक सोहळा आज मंगळवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून महानुभाव पंथाची पताका पुढे घेऊन जाणाऱ्या अनुयायांशी संवाद साधला. यावेळी परम पूजनीय कारंजेकर बाबांचा माझ्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच महानुभाव पंथातील संत श्रेष्ठींनी केलेल्या सन्मानाचा विनम्रपणे स्वीकार केला.