वनपरिक्षेत्र उत्तर धानोरा अंतर्गत येणार्या मूस्का येथील शेत शिवाराला लागून असलेल्या कंपार्टमेंट क्र.६२२ नियत क्षेत्र जगंलात दामोदर चैतू गावडे या शेतकर्यावर अस्वलाने हल्ला चढविल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटणा आज दि.२८ आगस्ट गूरूवार रोजी दूपारी १२ वाजेचा सूमारास घडली. दामोदर गावडे हे आज आपले बैल चराई करीता शेताकडे गेले होते यावेळी एक बैल जगंलाकडे गेल्याने त्याला शोधण्याकरीता तो जगंलात गेला होता यावेळी अस्वलाने त्याचावर हल्ला चढविला.