मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी सोमवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोन वाजता मोहोळ येथील सावली बंगला येथे मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या वेळी नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्न व समस्यांना गांभीर्याने ऐकून घेत आमदार खरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचा निर्धार आमदार खरे यांनी यावेळी व्यक्त केला.