चंद्रपूर जिल्ह्यातील आमडी (बेगडे) येथे पोळ्याच्या पाडवा सणाच्या निम्मित झेंडीमुंडी सुरु होती. यामध्ये दोघेही पैसे लावत होते. याच दरम्यान आरोपी व तक्रारदार यांच्यात पैसे घेतल्यावरून भांडण झाले. आरोपी पंकज गुणवंत गलांडे (३५) रा. आमडी याने चाकूने तीन ते चार वार करून भास्कर गुलाब शेरकुरे (४०) रा. सिल्ली, त. समुद्रपूर याला गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.