कथा ही रूपात्मक, तत्त्वज्ञान देणारी सूत्रात्मक, नामस्मरण करणारी मंत्रात्मक आणि आपुलकी वाढविणारी स्नेहात्मक अशी चार प्रकारची असते. कथा म्हणजे केवळ गोष्ट नव्हे तर ती जीवन जगण्याची दिशा दर्शविते, असे आध्यात्मिक संत तथा प्रख्यात कथाकार मोरारी बापू यांनी शुक्रवारी रामकथा पर्वात सांगितले. येथील दारव्हा रोडवरील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी सातव्या दिवशी त्यांनी माता-पित्याच्या गुणांविषयी माहिती दिली.