बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मुस्लिम बांधवांच्या पुढाकारणे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबारानिमित्त रक्तपेढी ची मागणी समोर आली. मेहकर येथील रुग्णांची हेळसांड आणि आरोग्य विषयक अडचण बघता लवकरच रक्तपेढी आणणार आहे तसा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक यांना तयार करण्यास सांगितला आहे.लवकरच या महत्वपूर्ण मागणीसाठी पूर्ण क्षमतेन पाठवा पुरावा करण्यात येईल.असे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले.