मूल आणि परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे बिलासपूर-चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्र. १२८५१) व चेन्नई-बिलासपूर सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्र. १२८५२) या दोन्ही गाड्यांचा थांबा आता मूल रेल्वे स्थानकावर निश्चित करण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.