जैन धर्मातील पवित्र ‘पर्युषण महापर्वास’ काळास सुरुवात झाली आहे. त्या निमित्त दाळमंडई येथे जय आनंद फाउंडेशनच्या वतीने जैन समाजातील नागरिकांसाठी सायंकाळच्या जेवणाची चौविहार (ब्याळू) ची डाळमंडई बाजारपेठेत मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचा प्रारंभ उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाला. यावेळी उद्योजक राजेश भंडारी, सतीश लोढा, मर्चंट बँक संचालक कमलेश भंडारी, पोपटलाल भंडारी, डॉ. विजय भंडारी, अजित गुगळे आदी उपस्थित होते