गडचिरोली दि ६ : कुरखेडा / गेवर्धा, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गेवर्धा यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्याने खास संगीत 'बाळा मिच तुझी आई रे ' या नाटकाचे उद्घाटन संपन्न झाले . या कार्यक्रमासाठी गेवर्धा गावातील आणि परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार कृष्णाजी गजबे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संगीत नाटकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंडळाने आयोजित केलेल्या 'लकी ड्रा ' चे बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले