आगामी गणेशोत्सव संदर्भात वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. यावेळी लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांचे पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी विविध विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवाबाबतचे नियोजन, पूर्वतयारी, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत उपाययोजनांचा नियोजनाचा आढावा यावेळी घेण्यात आला.