फिर्यादी सागर राजेश श्रीवास यांच्या तक्रारीनुसार 30 ऑगस्ट ला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास काहीजण रस्त्यावर धिंगाणा घालत असताना फिर्यादीने त्यांना हटकले असता शाहू नामक आरोपीने व अनोळखी दोन्ही इसमांनी फिर्यादी सोबत वाद करून शिवीगाळ केली व काठीने तसेच अज्ञात हत्याराने मारहाण करून जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी 30 ऑगस्टला रात्री अंदाजे 11 वाजताच्या सुमारास यवतमाळ शहर पोलीस शहर दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.