जन सुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीकडून आज वाशिमच्या तहसील कार्यालयासमोर जन सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि इतरपक्ष तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.