Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
छञपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना ठाकरे गटाला छत्रपती संभाजी नगर मध्ये मोठा धक्का मिळाला आहे. पक्षात ३७ वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या सहसंपर्कप्रमुख व माजी महापौर त्रंबक तुपे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. या त्रिंबक तुपेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे.