चंद्रपूर येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या टीडियुसी या संघटने तर्फे जागतिक फोटोग्राफर दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक व सत्कार सोहळ्यात सहभागी झालो. यावेळी विधानसभा अध्यक्ष सुनील भाऊ काळे व प्रफुल कुचनकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गणेश भाऊ साळवे, प्रितम भाऊ सातपुते यांनी केले होते. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत चंद्रपूर येथील विनाअनुदानीत असलेल्या मूकबधिर शाळेला टिडीयुसी या संघटनेतर्फे आर्थिक सहाय्य करण्यात आले.