धुळे जिल्ह्यात लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुपालक आणि गुरे व्यापाऱ्यांनी आपल्या पशुधनाचे तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत पाटील यांनी केले आहे. या आजारामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.