जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा बु. येथील शेतामध्ये वीज पडून २७ ऑगस्ट रोजी वंदनाताई प्रकाश पाटील व त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील तसेच शेतात काम करणाऱ्या मदतनीस निर्मलाताई रामचंद्र पराते यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील व तसेच पराते कुटुंबियाची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सात्वन केले व घटनेतील मृतांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली