पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे रात्रीच्या वेळी कोयत्याचा धाक दाखवून लुबाडण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रकचालक लखन निवृत्ती कचवे यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 34 आणि 394 नुसार गुन्हा दाखल केला आहे.