कॉटन मार्केट परिसरात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांवर 8 सप्टेंबरला रात्री उशिरा जीवघेणा हल्ला केल्याची खळबळ जनक घटना घडलेली आहे. त्याबद्दल चा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. आरोपीने पोलिसाला धमकी देखील दिल्याचे देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांनी जेव्हा आरोपीची कार थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही संपूर्ण घटना घडल्याची समोर आली आहे. दरम्यान आरोपी कार चालवीताना मद्यप्राशन करून असल्याची ही माहिती समोर आली आहे.