दि.31ऑगस्ट रोजी गोंदिया डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशन शाखा गोरेगावच्या वतीने अन्न व औषधी विभाग,वन विभाग,शिव मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने शिव मंदिर कवलेवाडा येथे विविध प्रजातीची झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ड्रग इन्स्पेक्टर अभिषेक चवरडाल,गोंदिया जिल्हाध्यक्ष उत्पल शर्मा, सचिव रूपेश रंहागडाले गोरेगाव,तालुकाध्यक्ष चंद्रशेखर बघेले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी शंभराच्या वर विविध प्रजातीची झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.