बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे एका 38 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना रात्री 12:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.या हत्येने संपूर्ण सैलानी परिसर हादरून गेला आहे.2 टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादामुळे ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.शेख नफीस शेख हफीज उर्फ बाब्या रा.इंदिरानगर,बुलढाणा असे मृतकाचे नांव आहे.