वृद्धाला डोळ्याचा आजार असून ते पायी फिरण्याकरिता जात असताना नहरच्या पाण्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पोलीस ठाणे कोराडी हद्दीत घडली आहे. मृतकाचे नाव जुनी वस्ती झेंडा चौक निवासी वामनराव पखिंडे वय 75 वर्ष असे सांगण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार आज 31 डिसेंबरला सकाळी 8 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास वामनराव पायी फिरण्याकरिता घरून निघाले होते. दरम्यान नहरच्या पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.