गुरुवारी दुपारी १२ वाजता साताऱ्यात स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात ग - ामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्या उपस्थितीत झाले.