मागील काही दिवसांपूर्वी दारू सोडलेल्या इसमाची प्रकृती बरी राहत नसल्याने त्याने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास झिरोबा येथील वनविभागाच्या नर्सरी येथे उघडकीस आली आहे. बुद्धेश्वर रासेकर (५०) रा लाखांदूर प्लॉट असेल घटनेतील मृतक इसमाचे नाव आहे.