* *व्हॅलिडीटीवर ठोस पावले उचलले जाणार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आरक्षणाच्या जीआरनंतर दाखल्यांच्या वैधतेचा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर विखे म्हणाले पूर्वी मनुष्यबळ कमी होत मात्र आता 29 जिल्ह्यांमध्ये उपजिल्हाधिकारी पदाचे अध्यक्ष नेमले आहेत. महसूल मंत्र्यांना मी विनंती केली आहे की दर सोमवारी जिल्हाधिकारी स्वतः तपासणी करून महिन्यात आलेल्या दाखल्यांवर काय कार्यवाही झाली ते पाहावं. यातून मार्ग काढण्यासाठी सरकार ठोस प्रयत्न करणार आहे.