आज दिनांक 10 सप्टेंबर सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील बनोटी गावात घडलेला एक अत्यंत क्रूर प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आठ दिवसांपूर्वी गावातील काही तरुणांनी मोठा अजगर पकडून त्याला ठार मारले. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी अजगराचे पोट फाडून आत अडकलेली बकरी बाहेर काढली. या अमानुष कृत्याचा व्हिडिओ मोबाईलवर टिपून सोशल मीडियावर टाकताच तो वणव्यासारखा पसरला आहे.