पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे साडेसात हजार एकराऐवजी तीन हजार एकर क्षेत्र संपादन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्गो विमानतळास साजेसे ठरणारे 'लॉजिस्टिक पार्क' मोठ्या जागेत करण्याचा निर्णय बदलण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पुरंदर विमानतळ हे २,२०० एकरात आणि सुमारे ३०० ते ४०० एकर क्षेत्रातच 'लॉजिस्टिक पार्क' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.