ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे या मागणी लगीन मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण केले. त्यानंतर काल महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे यांना जीआर दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र आता यामुळे ओबीसी संघटनांनी त्या जीआरचा निषेध नोंदविला असून गोंदिया शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघटनांनी त्या जीआर ची होळी केली व शासनाचा निषेध नोंदविला.