बुलढाणा शहराला जीवनवाहिनी ठरलेल्या येळगाव धरणावर 3 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन सोहळा उत्साहात पार पडला.या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष पुजाताई संजय गायकवाड,युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना नेते विजय अंभोरे, मा. नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, संजय हाडे, आशिषबाबा खरात, मोहन पऱ्हाड, बाळू जाधव, गोविंदा खुमकर, दादाराव लवकर, गोपालसिंग राजपूत आदी उपस्थित होते.