कारंजा ते मुर्तिजापूर रोडवर दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.00 वाजताच्या दरम्यान घडली. सदर अपघाताची माहिती लखन धोपे यांनी समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार यांना त्यांनी त्वरीत घटनास्थळी पोहचून जखमी स्वप्नील बावणे रा. उंबर्डा बाजार ह्याला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे भरती केले. यावेळी समाज सेवक प्रसन्नाभाऊ काळबांडे, पत्रकार धनंजय राठोड, सुमेध बागडे, छोटु उके, शिवम खोंड, अजय घोडेस्वार यांनी मोलाची मदत केली.