यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्ही येथे दिनांक 21 ऑगस्ट रोजी अंकुश कुलरकर यांच्यासोबत आरोपी राजेश गायधने यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घालत लोखंडी दांडक्याने मारहाण करून जखमी करून जीवाने मारण्याची धमकी दिली आहे. सदर घटने संदर्भात ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.