दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथे गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रंहागडाले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शंभरहून अधिक विविध प्रजातीचे झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी आमदार विजय रंहागडाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष केवलभाऊ बघेले, पन्नालाल बोपचे , बबलू गौतम यासह मोठ्या संख्येत परिसरातील गणमान्य नागरिक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.