पोलीस स्टेशन गणेश पेठ हद्दीतील गिरजा हॉटेलच्या बाजूला मागील अंदाजे पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या फॅक्टरीतील विहिरीमध्ये मानवी सांगाडा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.सदर विहीर अंदाजे पंधरा वर्षांपासून बंद असून, अनेक वर्षांपासून पाण्याने भरलेली आहे. त्यामुळे हा सांगाडा किती जुना आहे, हे निश्चित करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे.