उमरखेड शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उमरखेड पोलिसांची डिटेक्शन ब्रांच डीबी सतत सक्रिय असून नुकत्याच घडलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रवी ज्ञानेश्वर वैद्य वय 30 वर्ष राहणार नाथ नगर उमरखेड यास निष्पन्न केले आहे.