गडचिरोली : आरमोरी, दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी ठाणेगावजवळील आरमोरी गडचिरोली रोडवर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे रामेश्वर जिवन नैताम हे गंभीर जखमी झाले असता, या अपघातात त्यांचा एक हात निकामी झाले तसेच पायालाही गंभीर दुखापत झाली आहे . २ सप्टेंबरला माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या नियोजित दौऱ्या दरम्यान ठाणेगाव येथील रामेश्वर नैताम यांच्या निवास स्थानी भेट देऊन आस्थेने त्यांची विचारपूस केली व त्यांना दिलासा दिला तसेच शासनाकडून मिळणाऱ्या स्व . गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे लाभ व