लिंगायत समाजाला २ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार हैद्राबाद गॅझेट प्रमाणे ओबीसी प्रमाण पत्र द्यावे,हैद्राबाद गॅझेट नुसार लिंगायतासह ज्या जातीची कुणबी नोंद आहे त्या जातींना ओबीसी आरक्षण लागू करा,महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाकडून सर्व लिंगायत तरुणांना अर्थ सहाय्य करा,कपिलधार येथील १०० कोटी नियोजित विकास आराखड्यातील निधीतून विकास कामे करा आशा विविध मागणीसाठी लिंगायत समाजाने ७ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन दत्ता खंकरे यांनी केले आहे.