आशिया कप २०२५ मध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, "आम्ही या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करू. महिला रस्त्यावर येतील आणि आमची मोहीम 'सिंदूर रक्षा अभियान' आहे. तुम्ही म्हणालात की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही. जर पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही, तर रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे चालेल? हा देशद्रोह आहे, निर्लज्जपणा आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेला नाही.