वाशी तालुक्यातील पारा गावात मुंबईहून आलेल्या बांधवांचे पारंपरिक पद्धतीने जोरदार स्वागत करण्यात आले आहे. गावातील महिलांनी मंगल कलश व आरतीने औक्षण करून आलेल्या बांधवांचे स्वागत केले. औक्षणावेळी ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि महिलांनी केलेले उत्स्फूर्त स्वागत यामुळे गावात सणासारखे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांमध्ये परस्परांबद्दलची आपुलकी, जिव्हाळा आणि परंपरेची ओळख यामधून प्रकर्षाने दिसून आली.