वर्धा जिल्ह्याच्या सावंगी मेघे पोलीस ठाण्याने एक मोठी मोहीम राबवत अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ११ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे असे आज 23 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी पारधी बेडा, पांढरकवडा, सिखबेडा सावंगी मेघे, सालोड हिरापूर आणि येळाकेळी या भागांमध्ये छापे टाकले.